Blog Detail

Home Detail

राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये दोनशे पन्नास मुलांची मोफत तपासणी - संस्थापक अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर

शिरूर (प्रतिनिधी) -  येथील कुंभार आळी येथे  लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी  शिबिरामध्ये दोनशे पन्नास मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.राजर्षी शाहु प्रतिष्ठाण व हिराबाई कावासजी जहांगीर मेडिकल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे  राजर्षी शाहु प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर यांनी सांगितले

 

   


 सभागृहनेते प्रकाशशेठ धरिवाल यांच्या माध्यमातून शिरूर शहरात मोफत ऑक्सिजन पुरवठा करून अनेक रग्णांचे प्राण वाचवीणारे ऑक्सीजन दूत  संतोष शितोळे,तुकाराम खोले, बंट्टी जोगदंड,दादाभाऊ लोखंडे, सागर पांढरंकामे व याकाळात सामाजिक बांधिलकी जपत अनेक कुटुंबांना अन्नधान्याची मदत करणाऱ्या डॉ वैशाली साखरे,आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ संध्या गायकवाड यांनां राजर्षी शाहु कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 

         


सध्या कोरोना महामारीने सगळीकडे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.संभाव्य तिसरी लाटेची शक्यता वर्तविली जात आहे हि लाट  लहान मुलांना धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.या  पार्श्वभूमीवर राजर्षी शाहु प्रतिष्ठाणने लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळत सुमारे दोनशे पन्नास मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

           


    या शिबिरामध्ये शहरातील 0 ते १८ वयोगटातील मुला मुलींचे तज्ञ डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन, वजन. उंच्ची,कॅल्शियम, हाडांची तपासणी करून एक्सरे काढण्यात आले.शिबिरामध्ये मुलांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले असुन सहभागी मुलांना मास्क व खाऊ देण्यात आला असल्याचे अनिल सोनवणे यांनी सांगितले.

 

           


   मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मुलांच्या वाढत्या वयानुसार वजन व उंच्ची योग्य प्रमाणे वाढ होते कि नाही याची मोफत तपासणी  करण्यात येते व त्यांना मोफत औषधे दिले जात असल्याचे डॉक्टर संध्या गायकवाड यांनी सांगितले.

 

       

 


 राजर्षी शाहु प्रतिष्ठाण च्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले .यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, किसन जामदार, शशिकांत शिर्के,विजय शिर्के, नगरसेविका अंजली थोरात, नगरसेवक संजय देशमुख,संतोष जामदार, अमित शिर्के,शिवसेना शहर प्रमुख मयुर थोरात,संदिप जामदार, विनोद शिर्के, पत्रकार अनिल सोनवणे,पत्रकार मुकुंद ढोबळे, पत्रकार रवींद्र खुडे,बाबू जामदार, नितिन जामदार,श्रीतोष अभंग,डॉ संध्या गायकवाड, सुवर्णा अरबूज,डॉ शीतल भोर, डॉ अनघा देशमुख, सोनल कस्तुरे, ओंकार कांबळे, प्रमोद कंगारे, अविनाश शिंदे, लक्ष्मण कांबळे, स्नेहा कांबळे, सुमन शेळके, जयश्री क्षीरसागर, सविता जगदाळे, कल्पेश जगताप आदी उपस्थित होते.

Leave A Comment

;